- Advertisement -spot_img
Homeसांस्कृतिककृषीडोंगराळ - उष्ण भागात तरुणाने फुलवली सफरचंदाची शेती

डोंगराळ – उष्ण भागात तरुणाने फुलवली सफरचंदाची शेती

- Advertisement -spot_img

भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
हिमालयात पिकणारी सफरचंदाची शेती भोरमधील एका तरुण शेतकऱ्याने भोरच्या काळ्या मातीत सफरचंदांची लागवड करून ती जोपासून सफरचंदाच्या झाडांना फळे आल्यामुळे सफरचंदाची शेती यशस्वी करून दाखवली आहे. भोर शहरातील भोरदरा डोंगराजवळील वाघजाई मंदिर परिसरातील जागेत उष्ण वातावरणात आणि काळ्या मातीत सफरचंदाची रोपे लावून यशस्वी प्रयोग भोर मधील संदीप (बाबू) शेटे या तरुण शेतकऱ्याने साकार केला आहे.


दोन वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशातील सिमला येथून हार्मोन ९९ या सफरचंदाचे वर्णाचे १५ रोपांची १५ बाय १५ फुटाच्या अंतरावर या रोपांची लागवड केली. सेंद्रिय खतांचा वापर करून झाडांची जोपासना केली असल्याने सर्व झाडांना ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी दिले जात आहे. झाडे लावल्यानंतर एक वर्षातच त्याला फुले लागण्यास सुरुवात झाली होती; पण सुरुवातीचा बहर न घेता अजून एक वर्ष जाऊन दिले दुसऱ्या वर्षी झाडाची उंची साधारणता सात ते आठ फूट झाली त्यानंतर जो फुलांचा बहर आला त्यावेळी फळे घेण्यास सुरुवात केली आहे. एक रोप ७५० रुपये आणि इतर खर्च धरून २५ हजार रुपये खर्च झाला आहे. दरम्यान दोन वर्षानंतर झाडांना चांगल्या प्रकारची सफरचंद लागलेली असून सफरचंदाची बाग आता बहरली आहे. झाडांची ही पूर्ण वाढ झाली असून साधारण या झाडांना वर्षे भरात दोनशे तास थंडी लागते आणि ती मागील वर्षी चांगल्या प्रकारे मिळाल्याने झाडांची पूर्ण वाढ होऊन योग्य देखभाल केल्याने यंदा उत्तम प्रकारे सफरचंद लागली आहेत. एका झाडाला ३० ते ४० सफरचंद लागली आहेत.


हिमालयातील हिमाचलप्रदेश जम्मू काश्मीर येथे थंड हवेत येणारी सफरचंद भोरच्या काळ्या मातीतही बहरू शकतात, हे या प्रयोगातून सिद्ध झाले असल्यामुळे पुढील वर्षी तीन एकरात सफरचंदाची झाडांची लागवड करणार असल्याचे संदीप (बाबु) शेटे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page