गजानन गव्हाणे पाटील
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी पर्यटन मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना पुणे उपजिल्हाप्रमुख पदी हिवरे, ता. शिरुर येथील रेवणनाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र माजी राज्यमंत्री, शिवसेना उपनेते, शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर साहेब, युवासेना पुणे जिल्हाप्रमुख संदिप शिंदे यांच्या हस्ते रेवणनाथ गायकवाड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

निवडीबाबत बोलताना पुणे जिल्ह्यात युवकांचे संघटन करुन पक्ष संघटना बळकट करणार असल्याचे रेवणनाथ गायकवाड यांनी सांगितले.





