कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची परंपरागत चैत्र वद्य सप्तमी आणि अष्टमीची यात्रा गुरुवार दि. ९ एप्रिल आणि शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यात्रेचे निमित्ताने अनेक वर्षांनी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ वाजता श्रींची महापूजा आणि हारतुरे तर ८.३० वाजता पारंपरिक पद्धतीने आणि उंट, घोडे यांच्यासह श्री भैरवनाथ महाराजांची मंदिरापासून गावातील पालखी मार्गावरून भव्य दिव्य पारंपरिक वाद्य तसेच बँड लाऊन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर रात्री ९ वाजता ज्यो ज्योत्सना सपकाळ यांचे पाव्हणं चीज मी लई कडक हा हिंदी मराठी गाणी तसेच लावण्याचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. १० रोजी sabse बढकर जुई शेरकर यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी गावातील नागरिकांनी पालखी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यात्रा कमिटीचे माध्यमातून करण्यात आले आहे.

यंदाचे वर्षी पुणे अहिल्यानगर महामार्गाचे लगत असलेल्या बाजार मैदानात विविध लहान मोठे पाळणे, खेळण्यांची दुकाने तसेच इतर दुकाने लावण्यात येणार आहे. तसेच यात्रेच्या निमित्ताने श्री भैरवनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच महामार्ग आणि गावातील अंतर्गत रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.





