- Advertisement -spot_img
Homeराजकारणसामान्याच्या हितासाठी केंद्र शासन कटिबध्द : भाजपा प्रभारी प्रदीप कंद

सामान्याच्या हितासाठी केंद्र शासन कटिबध्द : भाजपा प्रभारी प्रदीप कंद

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
केंद्र शासनाने सर्व सामान्यांच्या विकासा करिता विविध योजना कार्यान्वित केल्या असुन सामान्याच्या हितासाठी शासन कटिबध्द असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व शिरुर विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे प्रभारी प्रदिप विद्याधर कंद यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकिर्दीर्स नऊ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपा महिला अल्पसंख्याक आघाडीच्या राज्य पदाधिकारी रेश्मा शेख, भाजपाचे तालुका प्रमुख आबासाहेब सोनवणे, संपर्कप्रमुख बाबूराव पाचंगे, किसान आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मचाले, पुणे जिल्हा अल्पसंख्याक आघाडी चे जिल्हाध्यक्ष राजू शेख, भाजपा युवा मोर्चाचे रोहित खैरे, रश्मी क्षीरसागर, सरचिटणीस विजय नरके, माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे आदी भाजपा चे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रदीप कंद म्हणाले की, देशात किसान सन्मान योजनेचा ११ कोटी ३० लाख शेतकऱ्यांना लाभ होत आहे. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. जलजीवन योजने मार्फत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठाची महत्वाकांक्षी योजना केंद्र शासनाने आणली असुन शिरुर विधानसभा मतदारसंघात या योजनेतर्गत विविध गावात पाणी पुरवठा योजनाचे काम सुरु आहे. केंद्र शासनाने आरोग्य विमा योजना आणली. शासनाच्या या विविध योजना सर्वसामन्याचा विकासासाठी आहेत. थेट लाभार्थ्याच्या बॅक खात्यावर पैसे जमा होतात. जनधन योजने अंतर्गत अनेकांची बॅक खाती सुरु झाली.
देशात रस्त्याचे जाळे उभे करण्यात येत आहे. पुणे नगर रस्त्यावर दुमजली रस्त्या तयार करण्यात येणार आहे.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

अष्टविनायक रस्त्यांची कामे ही मोठया प्रमाणावर शिरुर विधानसभा मतदारसंघात झाली असुन छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ परिसराचा विकासा करिता ४०० कोटी रु च्या विकास आरखडा शासनाने तयार केला आहे. कोरोना काळात जगातील सर्वात मोठे लसीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झाल्याचे कंद म्हणाले, पंतप्रधान सडक योजना, मुख्यमंत्री सडक योजना या मार्फत ही रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. आशिया खंडातील महत्वाची असणारी पुणे बाजार समिती ची २० वर्षा नंतर निवडणुक झाली व ती निवडणुक बहुमताने आम्ही जिंकली असे ही कंद यावेळी म्हणाले.
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी केले तर आभार बाबूराव पाचंगे यांनी मानले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page