- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणफुलगाव सोसायटीच्या चेअरमन पदी अशोक साकोरे;व्हॉईस चेअरमन पदी वंजारे

फुलगाव सोसायटीच्या चेअरमन पदी अशोक साकोरे;व्हॉईस चेअरमन पदी वंजारे

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
पूर्व हवेली तालुक्यातील औद्यागिक दृष्ट्या प्रगतशील समजल्या जाणाऱ्या फुलगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक दत्तात्रय साकोरे तर व्हाइस चेअरमन पदी बाळासाहेब उर्फ जितेंद्र यशवंत वंजारे यांची बिनविरोध निवड पार पडली. बिनविरोध निवडीचा पायंडा समाजासमोर एक नवा आदर्श फुलगाव ग्रामस्थ व सोसायटीने उभा केला आहे. नर्मदा ज्ञानोबा खुळे यांनी चेअरमन पदाचा तर चंद्रभागा ज्ञानोबा गवारे याची व्हाइस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.
चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अशोक साकोरे तर व्हॉईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बाळासाहेब वंजारे यांचा सत्कार लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य पै. किरण संपत साकोरे व उपस्थित प्रमुख मान्यवर,सोसायटीचे संचालक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी फुलगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक पोपट अंकुश खुळे, संचालक चंद्रभागा ज्ञानोबा गवारे, संचालक पै. किरण साकोरे, संचालक अविनाश साकोरे, संचालक अमित खुळे, संचालक नर्मदा खुळे, संचालक नवनाथ वागस्कर, संचालक मच्छिंद्र वागस्कर, संचालक सागर वागस्कर, संचालक अतुल वागस्कर, संचालक बाबाजी कदम आदी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने विविध योजनांचा लाभ मिळवून देणार असून सोसायटीच्या प्रगतीसाठी व शेतकऱ्यांच्या सदैव प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहोत. फुलगाव सोसायटीची चेअरमन, व्हॉईस चेअरमन पदाच्या निवडी बिनविरोध केल्याबद्दल सर्व संचालकांचे, ग्रामस्थांचे आम्ही सोसायटीच्या वतीने आभार व्यक्त करीत आहोत.
अशोक साकोरे,नवनिर्वाचित चेअरमन,फुलगाव वि.वि.कार्यकारी सोसायटी

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page