श्रीक्षेत्र वाडे बोल्हाई ग्रामस्थांची तुफान नावनोंदणी
कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
सिद्धी ग्रुपचे चेअरमन श्रीकांत (दादा) गावडे मित्र परिवाराच्या माध्यमातून श्रीक्षेत्र वाडे बोल्हाई येथील ग्रामस्थांसाठी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून उद्या दिनांक २९ मार्च व ३० मार्च रोजी श्रीक्षेत्र वाडे बोल्हाई येथून देवदर्शन यात्रा सुरू होणार असल्याची माहिती सिद्धी ग्रुपचे चेअरमन श्रीकांत गावडे व माजी उपसरपंच सविता गावडे यांनी दिली.

या देवदर्शन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर, श्री दत्त मंदिर गाणगापूर तसेच श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट या ठिकाणी यात्रा जाणार असून या यात्रेच्या नाव नोंदणीसाठी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने नाव नोंदणी करता करून सहभाग नोंदवित आहेत. या यात्रेसाठी बसेस ची व्यवस्था करण्यात आली असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची, जेवणाची, तसेच आरोग्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा श्रीकांत दादा गावडे मित्रपरिवार च्या वतीने देण्यात येणार आहेत.

या यात्रेसाठी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून शेकडो भाविकांनी यासाठी नाव नोंदणी केली आहे. २९ मार्च रोजी सकाळी सहा वाजता यात्रेचा शुभारंभ होणार असून सर्व सुख सुविधा देवदर्शन यात्रेत करण्यात येणार असल्याचे यावेळी श्रीकांत दादा भरत गावडे मित्र परिवार यांनी स्पष्ट करण्यात आले.





