कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
टाटा मोटर्स च्या पिंपरी कंपनी मध्ये झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात हवेली तालुक्यातील फुलगाव येथील हरी उद्धव धोत्रे विद्यालयास द्वितीय क्रमांकाचा चार लाख रुपये व सन्मान पत्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी टाटा मोटर्स चे श्री. कुट्टी, श्री. अग्रवाल,सतीश आवटे, श्री. बाबाराव यांचे सह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

या प्रसंगी फुलगाव श्री शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय धोत्रे, उपाध्यक्ष नारायणराव खूळे, उद्योजक प्रवीण रायसोनी, खजिनदार नामदेवराव वागस्कर, विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश केकाण, कलाशिक्षक श्रीरंग जाधव व विद्यार्थी साईराज वागस्कर, राजनंदिनी शिंदे उपस्थित होते.
यावेळी टाटा चा हॅरिअर व सफारी मॉडेल प्लॅट दाखवण्यात आला.





