- Advertisement -spot_img
Homeराजकारणहवेली तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही : माजी खा. शिवाजीराव आढळराव...

हवेली तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही : माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील

- Advertisement -spot_img

वाघोलीत हवेली तालुका शिवसेनेचा मेळावा संपन्न
गजानन गव्हाणे पाटील
वाघोलीतील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणीसह येथे नगरपरिषद करण्यासाठी नागरिकांची इच्छा असल्यास प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वाघोली येथे आयोजित हवेली तालुका शिवसेना मेळाव्यात दिली.


शिवसेना हवेली तालुका कार्यकर्ता मेळावा तसेच पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार समारंभ वाघोली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेना कार्यकर्ते तसेच महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसैनिक व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
आढळराव पाटील म्हणाले कि, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. वाघोलीतील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणीसह येथे नगरपरिषद करण्यासाठी नागरिकांची इच्छा असल्यास प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. या भागातील महिलांच्या रोजगारासाठी तसेच महिलांना व्यवसाय निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा आपण नजीकच्या काळात लाभ मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्याचे आयोजन गणेश सातव पाटील यांनी केले होते.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे, बाजीराव चव्हाण (युवा नेते शिवसेना), जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन पाटील, उपजिल्हाप्रमुख शामराव माने, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, संघटक निलेश काळभोर, महिला आघाडी हवेली धनश्री मस्के, दीपक लोणारी, अक्षय हरगुडे, पारस वाल्हेकर, रवींद्र शिंदे, सागर ढमढेरे, हरीश कांचन, सागर फरतडे, अभिषेक पवार, स्वप्निल लोले, पारस वाघमारे, निषाद पडवळ, गणेश सातव पाटील, स्वप्निल लोले आदी मान्यवर उपस्थित होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp
मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page