कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन निळ वादळ सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दीपिका भालेराव यांनी दिली.

दोन्ही महामानवांच्या जयंती निमित्ताने पेरणे फाटा, ता. हवेली येथील चंद्रप्रकाश धोका कर्णबधिर निवासी विद्यालयात शालेय शैक्षणिक साहित्य वाटप, संविधान जनजागृती तसेच या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मुलांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून जयंतीच्या निमित्ताने संघटनेच्या पदाधिकारी तसेच अनुयायांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक ए. एम. कांबळे, साहिल भालेराव, मयुर भंडारे यांचे वतीने करण्यात आले आहे.





