गजानन गव्हाणे पाटील
आव्हाळवाडी, ता. हवेली ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी अश्विनी विजय हरपळे व नितीन अप्पासाहेब घोलप यांच्यामध्ये कांटे की टक्कर पहावयास मिळणार आहे. सभापती नारायण आव्हाळे याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे आव्हाळवाडीत प्रामुख्याने श्री खंडोबा परिवर्तन पॅनेल व श्री खंडोबा प्रगती पॅनेल यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.
आव्हाळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ६ अर्ज दाखल झाले होते तर सदस्यपदाच्या १३ जागांसाठी ८६ अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी माघार घेण्याच्या दिवशी सरपंचपदासाठी दाखल झालेले ४ अर्ज माघारी घेतले गेले. सदस्यपदासाठी दाखल झालेले ५८ अर्ज माघारी घेतले गेले. सरपंचपदासाठी श्री खंडोबा परिवर्तन पॅनेलच्या अश्विनी विजय हरपळे तर खंडोबा प्रगती पॅनेलचे नितीन अप्पासाहेब घोलप यांचे अर्ज राहिल्याने या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.
वॉर्ड क्रमांक – १ विजय किसन आव्हाळे, प्रशांत रघुनाथ सातव, अभिषेक विलास सातव, सोनाली अमोल दाभाडे, वर्षा अतुल शिंदे, वॉर्ड क्रमांक – २ अविनाश बापूसाहेब सातव, सुजाता सचिन सातव, आरती अक्षय सातव, काकासाहेब रामराव सातव, सविता तानाजी सातव, सारिका माऊली सातव, वॉर्ड क्रमांक – ३ किरण परशुराम आव्हाळे, अश्विनी उमेश आव्हाळे, कोमल संदेश आव्हाळे, सोमनाथ भिकोबा आव्हाळे, वॉर्ड क्रमांक – ४ मंगेश किसन सातव, नवनाथ पांडुरंग सातव, अविनाश काळूराम कुटे, बापूसाहेब सोमनाथ सातव, संगीता राजेंद्र आव्हाळे, अनुष्का गणेश सातव, वॉर्ड क्रमांक – ५ विजय किसन आव्हाळे, अमोल रामदास आव्हाळे, बदामबाई दत्तात्रय आव्हाळे, पल्लवी नारायण आव्हाळे, संगीता अशोक आव्हाळे, सारिका पिरजी आव्हाळे, अविनाश दिलीप आव्हाळे हे उमेदवार रिंगणात आहेत.

दोन्ही पॅनलकडून जोरदार शक्ति प्रदर्शन करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदारराजाचा मानसन्मान वाढलेला दिसून येत आहे.





