- Advertisement -spot_img
Homeसांस्कृतिककृषीभात मळणी साठी आधुनिक पद्धतीचा वापर ; पारंपरिक खळी झाली नामशेष

भात मळणी साठी आधुनिक पद्धतीचा वापर ; पारंपरिक खळी झाली नामशेष

- Advertisement -spot_img

भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भाताचे अगार म्हणून ओळख असलेल्या महूडे भागात भात कापणी जोरात सुरू असली तरी भात मळणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना शेतकरी दिसत आहेत. तर पारंपरिक पद्धतीने भात मळणी साठी बैलांच्या वापरची खळी मात्र नामशेष झालेली दिसत आहेत.
सध्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात भात कापणी जोरदार चालू आहे. शेतकरी मात्र शेतात किंव्हा शेताच्या बाजूला मोकळ्या जागेत भाताचे उढवे लावत आहेत.पण पारंपरिक पद्धतीने भात मळणी साठी लागणारे खळ्याचा वापर नामशेष होताना दिसत आहे. खळ्यामध्ये सुरुवातीला भात झोडून वेगळे केले जाते. भात झोडून झाल्यावर असणारा भाताचा पेंढा खळ्यात हांतरला जातो व त्यावर तिवढ्याला बैल बांधून फिरवले जातात त्याला भाताचा पेंढा मळून घेतला जातो तो भाताचा पेंढा जनावरांसाठी उपयोगात आणला जातो. बैलाची संख्या कमी झाल्याने व खळ्यातील मळणीसाठी बैल मिळत नाहीत मात्र पारंपरिक खळे नामशेष झाली आहेत.


शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता भात काढणी पासून ते मळणी पर्यंत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर हा शेतकरी करताना दिसत आहे. पारंपरिक खळी लोप पावत चालली आहेत.भात काढणीला सुरुवात झाल्यानंतर भल्या पहाटे मळणी करण्यासाठी शेतात गजबज दिसायची. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पारंपरिक खळी न काढल्याने शेतातील गजबज दिसत नाही. शेतीच्या कामात खेळीमेळीचे वातावरण दिसायचे ते सध्या दिसत नाही. पारंपरिक खळी व शेती तसेच जुने भाताचे वाण पहावयास मिळत नाही.
शेतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याने व मजुरी परवडत नसल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेची बचत पैसे बचत होते. व शरारिक त्रास कमी होतो. बैलाच्या साहाय्याने मळलेला पेंढा हा जनावरांसाठी चागला असतो पण मलानिसाठी बैल मिळत नाहीत.त्यामुळे शेतकरी हा पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक शेतीकडे वाटचाल करताना दिसत आहे. असे मत ह भ प धोंडीबा खुटवड, चंद्रकांत इंगवले यांनी मत व्यक्त केले.


डिझेल चे दर गगनाला भिडत चालले आहेत त्यामुळे भात माळणीचे दर वाढवावे लागत आहे .त्यामुळे शेतकरी पोत्याचे दर वाढविल्यामुळे नाराज आहेत अशात धंदा करणे अवघड होत आहे असे मत भात मळणी व्यवसायिक विजय बांदल यांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page