- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भीमातील वाहतूक कोंडी जैसी थे; प्रशासन करणार का बेशिस्त वाहनांवर कार्यवाही

कोरेगाव भीमातील वाहतूक कोंडी जैसी थे; प्रशासन करणार का बेशिस्त वाहनांवर कार्यवाही

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या कोरेगाव भीमा येथील चौकांमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाणात वाढ झाली असून या चौकांमध्ये सकाळ व सायंकाळी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.


कोरेगाव भीमा हे पंचक्रोशीतील महत्वाचे बाजार पेठेचे गाव असल्याने गावात खरेदी साठी पेरणे, वाजेवाडी, डिंग्रजवाडी आदी भागातून असंख्य नागरिक येत असतात. त्यातच त्यांची लहान मोठी वाहने सर्रास पणे पुणे नगर महामार्गावर लावण्यात येत असल्याने अनेकदा इतर वाहनांना याचा तास सहन करावा लागतो. त्यामुळे दोस्ती चौक, वढू चौक, वाडीफाटा या भागात वाहतूक कोंडी होत असते. त्यातच अनेक अल्पवयीन मुले दुचाकी भरधाव वेगात याच चौकातून जात असल्याने एखादा मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता आहे.


त्यातच नव्याने वढू रस्ता ते नगर रस्ता या भागाला जोडणारा रस्ता तयार करण्यात आल्याने अनेक वाहन चालक या रस्त्यावरून थेट महामार्गावर येत असल्याने अनेकदा वाद होतात. त्यातच गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात येणारे अनेक लोक थेट रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने गुरुवारी अनेक तास वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना व वाहन चालकांना करावा लागतो. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासन पुढाकार घेणार का हे पाहणे आचित्याचे ठरणार आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page