गजानन गव्हाणे पाटील
श्री क्षेत्र तुळापूर, ता.हवेली येथे त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय च्या जयघोषात स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती श्री शंभू महाराजांचे समाधी स्थळ हजारो दिव्यांचे प्रज्वलन करत दीपोत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी छत्रपती श्री संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आकर्षक फुलांनी सजविण्यात आले. अंगणात रंगीबेरंगी रांगोळी काढत परिसरात विविध प्रकारच्या दिव्यांच्या माळा लावत हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले. खास करून लेझर शोने नागरिकांचे लक्ष वेधल्याचे दिसून आलं.

श्री शंभू महाराजे व कवी कलश महाराज यांचे पूजन करून प्रथम दीप प्रज्वलित करण्यात आले.प्रेरणा मंत्र व श्लोकाचे गायन गात फटाक्यांच्या आतषबाजीेत दीपोत्सव उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. दीपोत्सवाचे नियोजन समस्थ ग्रामस्थ तुळापूर यांनी केले असल्याचे कुमार ज्ञानेश्वर शिवले यांनी सांगितले.

या प्रसंगी सरपंच गुंफा इगंळे, उपसरपंच राजाराम शिवले ,माजी उपसरपंच पवन खैरे, संतोष शिवले, ज्ञानेश्वर शिवले, संपत शिवले, विनोद राउत, माजी सरपंच ज्ञानेश्वर जिजाबा शिवले, रुपेश शिवले, लोचन शिवले, सचिन शिवले, नवनाथ शिवले, संतोष शिवले, शिवाजी शिवले, गणेश पुजारी, माजी चेअरमन राजुनाना शिवले, सागर शिवले, योगेश शिवले, विशाल शिवले, पाडुरंग शिवले, खंडु शिवले, हनुमंत शिवले, आप्पा जगताप, सोपान शिवले तसेच परिसरातील शंभू भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





