हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील भाटघर जलाशयाच्या किनारी वसलेल्या ऐतिहासिक मौजे पसुरे गावात गेल्या पन्नास वर्षांहून अधिकची परंपरा असलेला काकड आरतीचा उत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहात गेले महिना भरापासून सुरू होता. ग्रामदैवत श्री वाढेश्वर देवाच्या मंदिरात ह. भ. प. पढेर महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नंतर शेकडो भाविकांनी हरिनामाच्या जयघोषात काकड आरतीचे वेळवंडी नदीत विसर्जन केले. त्या नंतर उपस्थितांना महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन काकड आरती उत्साहाची सांगता झाली.

काकड आरती च्या माध्यमातून गावातील सकाळ मंगल मयी होऊन गावात पवित्र व ऊर्जावान वातावरण निर्मिती होत असते असे काकड आरती महोत्सव समितीचे प्रमुख ह. भ. प. विजय मोरे यांनी सांगितले. या कार्यक्रमा साठी पंचक्रोशीतील व गावातील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.





