११०० पणत्या लावून दीपोत्सव साजरा
भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भोर शहरातील शिवस्मारक चौपाटी येथे किर्तिकी (त्रिपुरा) पोर्णिमेनिमित्त ११०० पणत्या लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला.
रोहिडा शिवजयंती उत्सव समिती भोर यांच्या शिवस्पर्श निधितून चौपाटी येशील श्री छञपती शिवाजी महाराजांची मूर्ती, एसटी स्टंँड समोरील श्री छञपती शिवाजी महाराजांची मूर्ती, श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मुर्ती व श्री भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्तींना गेले दहा वर्षांपासून दर पोर्णिमा अमावस्या तसेच प्रत्येक सणांदिवशी पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे.

कार्तिक (त्रिपुरा) पौर्णिमा या निमित्त महापुरुषांच्या मुर्तींना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच चौपाटी येशील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारक येथे ११०० पणत्या लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. या ११०० दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला होता





