- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणविश्व हिंदू परिषद हितचिंतक अभियानाचा वाघोली मध्ये शुभारंभ

विश्व हिंदू परिषद हितचिंतक अभियानाचा वाघोली मध्ये शुभारंभ

- Advertisement -spot_img

वाघोली : प्रतिनिधी
   “कणाकणामध्ये ईश्वर व्यापलेला आहे” अशा भावनेच्या हिंदू समाजाच्या विश्वातील अलौकिक संघटन असलेल्या विश्व हिंदू परिषदेचे सदस्यता नोंदणी हितचिंतक अभियान वाघोली शहरांमध्ये दिनांक 07 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर, 2022 पर्यंत राबविण्यात येत आहे. वाघोली शहरातील हिंदुत्ववादी संघटन विश्व हिंदू परिषद याच्या सदस्य नोंदणी शुभारंभ सुरु झाला आहे.
विश्व हिंदू परिषदेमार्फत देशभरामध्ये ५७०० सेवा प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये अनाथालय, गोशाळा, वसतीगृह, रुग्णालय इत्यादींचा समावेश आहे. गो संवर्धन, गोरक्षण, धर्मांतरण रोखणे, मठ मंदिरांचा संपर्क साधून त्यांचे शक्ती केंद्रात रूपांतरण करणे, जनमानसात राष्ट्रीय भावना जागृत करून देश सेवेसाठी प्रवृत्त करणे, संत महंत धर्माचाऱ्यांना घेऊन धर्मसभेचे आयोजन करणे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून सुसंस्कृत हिंदू समाज घडवण्याचा प्रयत्न करणे ही विश्व हिंदू परिषदेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. अशा या विशाल संघटनेचे आपण हितचिंतक व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.


हितचिंतक अभियान हे 07 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये वाघोली शहरांमध्ये राबवण्यात येणार आहे समाजातील कोणतीही व्यक्ती केवळ वीस रुपये नाम मात्र शुल्क देऊन विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनेचे हितचिंतक होऊ शकतो त्यासाठी त्यांना विश्व हिंदू परिषदेचे माहितीपत्रक आणि वीस रुपयाची पावती देखील प्रदान करण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मोठ्या संख्येने हिंदू समाज एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि संघटनेचे हितचिंतक करून घेणार आहेत अशी माहिती या अभियानाचे प्रमुख नरेंद्र पाटील यांनी दिली.
यावेळी विश्व हिंदू परिषद पूर्व विभाग मंत्री धनंजय गायकवाड, वडगावशेरी भाग अध्यक्ष शिवाजीराव गोते, बजरंग दल प्रमुख वाघोली मनोज ठाकूर, माजी उपसरपंच वाघोली शांताराम कटके, भाजपा हवेली तालुका सरचिटणीस विजय जाचक, वाघोली मंत्री नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page