- Advertisement -spot_img
Homeराजकारणआमदार अशोक पवार यांच्या शेतकरी विकास पॅनेलचे घोडगंगा कारखान्यावर एकहाती सत्ता

आमदार अशोक पवार यांच्या शेतकरी विकास पॅनेलचे घोडगंगा कारखान्यावर एकहाती सत्ता

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
विरोधकांनी जंग जंग पछाडून ही अखेर रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत आमदार व कारखान्याचे अध्यक्ष ॲड अशोक पवार यांनी विरोधकाना धोबी पछाड देत शिरुरच्या राजकारणात आपणच किंगमेकर असल्याचे दाखवून दिले. विरोधकाना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. विरोधी घोडगंगा किसान क्रांतीचे दादापाटील फराटे विजयी झाले .
प्रमुख विजयी उमेदवारामध्ये आमदार ॲड अशोक पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कुरुंदळे, आबासाहेब पाचुंदकर यांचा समावेश आहे. न्हावरा फाटा येथील कानिफनाथ मंगल कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली होती पहिल्या फेरीपासूनच सत्तारूढ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलचा उमेदवारानी मतात आघाडी घेतली होती.


गेल्या २० वर्षाहून आधीक काळ कारखान्यावर पवार यांची एकहाती सत्ता आहे. साहजिकच पवाराच्या एकहाती सत्तेला आव्हान देण्यासाठी पवार यांचे सर्व विरोधक एकत्र येत पवाराच्या पराभवासाठी मोठी ताकद विरोधकांनी लावली होती. यंदा परिवर्तन होणारच असे विरोधक मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होते.
राजकारण व सहकारातील आपल्या सर्व अनुभव पणाला लावित व विरोधकांना आपल्या ताकदीची जाणीव न होवू देता राजकिय डावपेच टाकत राजकियदृष्ट्या आस्तित्वाच्या व प्रतिष्ठेचा लढतीत अशोक पवार यांनी विरोधकांना चारीमूड्या चीत केले .
विरोधकांनी कारखान्यावर असणारे कर्जे, खाजगी साखर कारखानदारी व मृत सभासद वारस नोंदीचा विषयावरुन कारखान्याचे अध्यक्ष ॲड अशोक पवार यांना घेरले होते. त्यातच माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांना श्रध्दांजली म्हणून मतदाराना परिवर्तनाची साद घातली होती. यामुळे यंदाचा निवडणूकीत परिवर्तन होणारच अशी वातावरण निर्मिती विरोधकांनी केली होती. परंतु अशोक पवार यांच्या साखर कारखानदारीचा अनुभव, निष्ठावंत कार्यकर्ते व पक्षावर असणारी भरभक्कम पकड व संकटाना संधी मानून सकंटाचे संधीत रूपांतर करण्याचा गुणाने त्यांनी या निवडणूकीत बाजी मारली.


राजकारणातील उच्च शिक्षित व अभ्यासू नेता अशी पवार यांची प्रतिमा आहे. त्याच बरोबर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पत्नी सुजाता पवार यांची त्यांना असणारी साथ व विश्वासू कार्यकर्त्यांची फळी या विजयासाठी महत्वाचा ठरल्या. संचालक मंडळाच्या पॅनेल मधून उमेदवारी देत असताना अनेक विद्यमान संचालकाना उमेदवारी नाकारत त्यांनी नवीन उमेदवाराना संधी दिली व उमेदवारी नाकारलेले इच्छूक व उमेदवारी न मिळालेले संचालक यांच्या नाराजीचा फटका पॅनेलचा मतदानावर होणार नाही याची दक्षता घेतली.
अशोक पवार यांनी पॅनलला विजयी तर केलेच त्याच बरोबर या निवडणूकीच्या माध्यमातून आपले पुत्र ऋषीराज पवार यांनाही तालुक्याचा राजकारणात सक्रिय केले. कारखानावर बिनविरोध संचालक म्हणून ऋषीराज याला निवडून आणून दमदार अशी एंट्री राजकारणात केली. कारखान्याचे संस्थापक माजी आमदार रावसाहेब पवार विद्यमान अध्यक्ष अशोक पवार व आता संचालक म्हणून निवड झालेले ऋषीराज पवार या क्रमाने आता तीसरी पिढी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात पवार परिवाराची सक्रिय झाली आहे .


पवार यांनी सत्ता हस्तगत केली असली तरी आगामी काळात कारखान्यावरील कर्ज, मृत सभासद वारस नोंदी, कामगारांच्या थकलेला पगार या सर्व प्रश्नांवर मार्ग काढायचा आहे . त्यातच राज्यात झालेले सत्तातरण यामुळे आगामी काळात आव्हानाचा काटेरी मुकुट त्याच्या शिरावर असणार हे निश्चित.
गटनिहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
मांडवगण फराटा
१) फराटे दादापाटील (घोडगंगा किसान क्रांती)
२ ) फराटे संभाजी (शेतकरी विकास पॅनेल)
इनामगाव
1) मचाले सचिन (शेतकरी विकास पॅनेल)
2) माने नरेंद्र (शेतकरी विकास पॅनेल)
वडगाव रासाई (शेतकरी विकास पॅनेल)
१) आमदार ॲड. अशोक पवार (शेतकरी विकास पॅनेल )
२) उमेश साठे (शेतकरी विकास पॅनेल)
न्हावरे
संजय काळे (शेतकरी विकास पॅनेल)
कोरेकर मानसिंग (शेतकरी विकास पॅनेल)
निंबाळकर शरद (शेतकरी विकास पॅनेल)
तळेगाव
गवारी सोपान (शेतकरी विकास पॅनेल)
ढमढेरे विश्वास रामकृष्ण (शेतकरी विकास पॅनेल )
भुजबळ पोपट रामदास (शेतकरी विकास पॅनेल)
शिरुर ग्रामीण
वाल्मिक कुरुदळे (शेतकरी विकास पॅनेल)
थोरात सुहास (शेतकरी विकास पॅनेल )
पाचुंदकर आबासाहेब (शेतकरी विकास पॅनेल)
महिला गट
मंगल कोंडे, वैशाली जगताप (शेतकरी विकास पॅनेल)
इतर मागासवर्ग प्रवर्ग –
शिवाजी गदादे (शेतकरी विकास पॅनेल)
भटक्या विमुक्त जमाती
बीरा शेंडगे (शेतकरी विकास पॅनेल)
अनुसुचित जाती जमाती मतदारसंघ
उत्तम सोनवणे (शेतकरी विकास पॅनेल)
संस्थात्मक मतदार संघ ऋषीराज अशोक पवार (बिनविरोध) (शेतकरी विकास पॅनेल )

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page