- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या नोकरी महोत्सवाला भरभरुन प्रतिसाद

आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या नोकरी महोत्सवाला भरभरुन प्रतिसाद

- Advertisement -spot_img

दौंड : प्रतिनिधी
केडगाव चौफुला, ता.दौंड येथे आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य नोकरी महोत्सवात ८५० बेरोजगार कामगारांनी नोंदणी केली असताना यातील ३०६ तरुणांना या कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले असल्याने तालुक्यातील ही भव्य नोकरी ठरली आहे. या नोकरी मोहस्तवात ४० नामांकित कंपन्या आल्या असताना तालुक्यातील बेरोजगार तरुणांनी या नोकरी मोहस्तवात नोंदणी केल्याने ३०६ उमेदवारांना या कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आली असल्याची माहिती नोकरी महोत्सवाचे मुख्य आयोजक व शिवकृपा डेव्हलपर्सचे संस्थापक तानाजी केकाण यांनी आपली लोकशाहीस दिली.
अँड राहुलदादा कुल विचारमंच व शिवकृपा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असल्याने हा तालुक्यातील प्रथमच भव्य नोकरी मोहत्सव ठरला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाची माहिती जॉब प्रोचे एच आर गरुदेव गवंडी यांनी दिली आहे..

नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांना आमदार राहुल कुल हे मार्गदर्शन करताना म्हणाले की कोणाला नोकरी मिळाली नाही म्हणून खचुन जाऊ नका या नोकरी मोहत्सवात कोणाला अपयश येईल तर कोणाला यश येईल मात्र जिद्द सोडू नका उपजीविका करण्यासाठी नोकरी व व्यवसाय हे दोन पर्यंत उपलब्ध असताना ज्यांना व्यवसाय उतरायचे त्यांनी व्यवसाय करा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गडधे यांनी केले तर प्रस्ताविक महेश टेळे यांनी केले आहे तर कार्यक्रमांचे आभार आबासाहेब चोरमले यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार राहुलदादा कुल विचारमंच दौंड तालुका व तानाजी केकाण मित्र परिवार यांनी केला आहे..


दौंड तालुक्याचे लोकप्रिय आरोग्यदूत आमदार राहुल कुल हे तालुक्यातील जनतेसाठी फायदेशीर कामे करत असताना कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या तर काही तरुण बेरोजगार झाले असल्याने आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला असल्याने याला तालुक्यातील तरुणांनी भारगोस असा प्रतिसाद दिल्याने या उपक्रमातुन तालुक्यातील काहीतरी तरुणांना नोकरी मिळाल्याने समाधान वाटत आहे यापुढे आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जनतेच्या हितासाठी लोकहिताचे कामे करण्यात येणार आहे…
तानाजी केकाण -सामाजिक कार्यकर्ते

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page