- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआमदार संग्राम थोपटेंच्या वाढदिवसानिमित्ताने भोर येथे रोजगार मेळावा संपन्न

आमदार संग्राम थोपटेंच्या वाढदिवसानिमित्ताने भोर येथे रोजगार मेळावा संपन्न

- Advertisement -spot_img

भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भोरचे आमदार संग्राम थोपटेंच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित भोर येथील रोजगार मेळाव्यात २,५६७ सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सहभाग घेतला, तर ११७० जणांना ट्रेनिंगला पाठविले आहे. ९६० जणांना नोकरी देण्यात आल्या आहेत.
संग्राम थोपटे गौरव समितीच्या वतीने अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणात रोजगार मेळावा आयोजित केला होता. रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले. यावेळी राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरूपाताई थोपटे, माजी मंत्री अनंतराव थोपटे, बाळासो थोपटे, सुधीर खोपडे, गजानन कुलकर्णी, किरण रहाणे, गीतांजली शेटे, दीपक पवार, सदरुल्ला, मिनल अनिल सावले, आनंद आंबवले, पृथ्वीराज थोपटे, विश्वनाथ रोमण, सुमंत शेटे, विजय शिरवले, प्राचार्य पी.जी. देशमुख, राहल खामकर,पंढरीनाथ भिलारे, अभिषेक येलगुडे, सचिन हर्णसकर, चंद्रकांत मळेकर व सुशिक्षित तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. प्रस्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजक स्वरूपा थोपटे यांनी नियोजनाची व रोजगार मेळाव्याची सविस्तर महिती दिली.
या मेळाव्यात झी लॉन प्रा. लि., युवा हब, हुंडाई टेक्नॉलॉजी, अशा १०९ कंपन्या रोजगार मेळाव्यासाठी आपले स्टॉल लावून सहभागी झाले होते. २,५६७ तरुणांच्या मुलाखती घेऊन यावेळी ९६० सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी विविध कंपन्यांनी नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आली. यामुळे तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page