- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशालेय शिक्षण मंत्र्यांशी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विविध प्रश्नांवर चर्चा

शालेय शिक्षण मंत्र्यांशी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विविध प्रश्नांवर चर्चा

- Advertisement -spot_img

पुणे प्रतिनिधी : नयना पाचारणे
राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मुंबई येथील त्यांच्या रामटेक या निवासस्थानी भेट घेऊन राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष भिमराव शिंदे यांनी आपली लोकशाहीस दिली.
संघटनेच्या वतीने शिक्षण परिषद आयोजित करण्यासंदर्भात चर्चा करुन जानेवारी २०२३ मध्ये कोल्हापूर किंवा सिंधुदूर्ग यापैकी एका जिल्ह्यात शिक्षण परिषद घेण्यासाठी संघटनेला भेटीचा वेळ देतो असे सांगितले आहे. तसेच इतर सर्व मागण्यांकरिता पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये चर्चेकरिता संघटनेला निमंत्रित करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक पाटील यांनी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ओळखपत्र देण्याबाबत सर्व माहिती घेऊन कार्यवाही सुरु करु असे सांगितले.


या प्रसंगी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर, राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे, राज्य संपर्क प्रमुख प्रदीप शिंदे, राज्य सहसचिव माधव वायचाळ, राज्य प्रवक्ता सुनिल गुरव, राज्य महिला प्रतिनिधी चंदाराणी कुसेकर, पुणे जिल्हाध्यक्ष भिमराव शिंदे, ठाणे जिल्हाध्यक्ष विजयकुमार देसले, कोल्हापूर सरचिटणीस नवनाथ व्हरकट, कोकण विभाग कार्याध्यक्ष आनंद जाधव, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी भूषण घोलप आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page