भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भोर उपजिल्हा रुग्णालय भोर यांच्या वतीने व अपक्ष ग्रामपंचायत सदस्य अक्षय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काळभैरवनाथ मंदिर कीवत, ता.भोर येथे महिलासाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७६ महिलांची तपासणी करण्यात आली.

कीवत येथे अक्षय चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ७६ महिलांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले तसेच आरोग्य तपासणी करून उपजिल्हा रुग्णालयामार्फत औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके, वैद्यकीय अधिकारी दंतचिकित्सक डॉ .भागवत, वैद्यकीय अधिकारी डॉ. भोसले मॅडम यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. अधिकारी श्री भुजबळ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ योगेश सर व परिचारिका कोळी मॅडम, समुपदेशक शितोळे मॅडम व वाहन चालक उमेश जेधे उपस्थित होते. समीर घोडेकर, मंगेश आवाळे, आदेश चंदनशिव, अजित चंदनशिव , सिद्धेश चंदनशिव, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत चंदनशिव, किशोर चंदनशिव, अण्णा थोपटे, पांडुरंग चंदनशिव , भगवान चंदनशिव, ग्रामसेवक डोंबाळे पद्माकर, अंगणवाडी सेविका कविता बोडके, महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगला चंदनशिव, माधुरी चंदनशिव, नर्मदा चव्हाण, बायडाबाई थोपटे, दत्तात्रय खोपडे, दिगंबर चंदनशिव आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





