दौंड : प्रतिनिधी
केडगाव चौफुला, ता.दौंड येथे आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि ५ रोजी सकाळी दहा वाजता भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात ५० च्या अधिक नामांकित कंपन्या येणार असल्याने याचा तालुक्यातील बेरोजगार तरुणांनी फायदा घ्यावा. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना या कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याची माहिती नोकरी महोत्सवाचे मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते तानाजी केकाण यांनी दिली आहे.

अँड राहुलदादा कुल विचारमंच व शिवकृपा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. केडगाव, ता.दौंड चौफुला येथील सुपा रोडवरील श्रीकृष्ण मंगलकार्यालयात ही भव्य नोकरी भरती मेळावा होणार असल्याने या नोकरी भरती महोत्सवात पन्नास च्या अधिक नामांकित कंपन्या येणार असल्याने तालुक्यातील बेरोजगार तरुण याचा फायदा घ्यावा असे अहवान केकाण यांनी केले आहे.
गरजू बेरोजगार युवक-युवतींनी या उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य संयोजक तथा शिवकृपा डेव्हलपर्स संस्थापक तानाजी केकाण यांनी केले आहे. इच्छुकांना नाव नोंदणीसाठी https://forms.gl/322s6HkEakcFbiVR9 या लिंकवर आपली माहिती भरावी अथवा अधिक माहितीसाठी 9822218121 या नंबरवर संपर्क साधावा.

” तालुक्याचे आरोग्यदूत आमदार राहुल कुल यांनी तालुक्यातील अनेक तरुणांना नोकरी मिळून दिली असताना कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काही तरुण बेरोजगार झाले असल्याने आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त तालुक्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळून देण्यासाठी ऍड राहुलदादा कुल विचारमंच व शिवकृपा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबण्यात आला आहे. “
तानाजी केकाण -सामाजिक कार्यकर्ते





