गजानन गव्हाणे पाटील
पुणे महानगरपालिकेच्या उंबरठ्यावर असलेल्या हवेलीतील आव्हाळवाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच शरद आव्हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच विलास सातव यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ललिताकाकी आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी शरद आव्हाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक अतुल कोहिणकर यांनी काम पाहिले.

यावेळी माजी सभापती नारायण आव्हाळे, माजी सरपंच प्रवीण आव्हाळे, रामदास आव्हाळे, चंद्रकांत आव्हाळे, माजी उपसरपंच नंदकुमार तांबे, विलास आव्हाळे, राहुल सातव, ग्रामपंचायत सदस्य विक्रम कुटे, वंदना आव्हाळे, सीमा सातव, मयूर सातव, मंदाकिनी सातव, अनिता आव्हाळे, अतुल शिंदे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

निवडीच्या नंतर फेटा घालून ग्रामस्थांना वतीने हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उद्योजक विक्रमशेठ कांचन पाटील, अभिजीतशेठ उंद्रे, सरपंच सोमनाथ चौधरी, समाधानशेठ शिंदे, सचिनशेठ चौधरी, विनयशेठ चौधरी, संदीप दादा आव्हाळे आदी उपस्थित होते.





