- Advertisement -spot_img
Homeआरोग्यमोतीबिंदू शस्त्रक्रियेचा ७५ जनांनी घेतला लाभ

मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा ७५ जनांनी घेतला लाभ

- Advertisement -spot_img

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी लाभ घेण्याचे भाजपा वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांचे आवाहन
गजानन गव्हाणे पाटील
भारतीय जनता पार्टी वाघोली आयोजित मोफत आरोग्य शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्रक्रियासाठी १३८ जणांनी नोंदणी केली होती. त्यातील पहिल्या टप्यात २० नागरिकांची तर दुसऱ्या टप्यात ३० व तिसऱ्या टप्यात २५ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण झाली आहे. एकूण ७५ लोकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून नागरिकांनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी संपर्क करून लाभ घ्यावा असे आवाहन भाजप वाघोली शहर अध्यक्ष केतन (भाऊ) जाधव यांनी केले आहे.


वाघोली (ता. हवेली) येथे भारतीय जनता पार्टी वाघोली शहरच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन, डोळे तपासणी, चष्मे वाटप, एक्स रे तपासणी मोफत करण्यात आले होते. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत माहिती व हृदय शस्त्रक्रिया, मेंदू विकार शस्त्रक्रिया, कॅन्सर, मणका विकार शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार असल्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. त्यानुसार बहुसंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला होता. सेवा समर्पण अभियाना अंतर्गत विविध सामाजिक हिताचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी वाघोली शहर अध्यक्ष केतन (भाऊ) जाधव यांचेकडून सुरुच आहेत. यामध्ये एकूण ७५ नागरिकांनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा यशस्वी लाभ घेतला आहे. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी नागरिकांनी संपर्क करावा असे आवाहन केतन (भाऊ) जाधव यांनी केले आहे.


महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत माहिती व हृदय शस्त्रक्रिया, मेंदू विकार शस्त्रक्रिया, कॅन्सर, मणका विकार शस्त्रक्रिया अल्पदरात केली जाणार आहे. सेवा समर्पण अभियाना अंतर्गत एकूण ७५ नागरिकांनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा यशस्वी लाभ घेतला आहे, याचे मोठे समाधान वाटते. –

केतन (भाऊ) जाधव (अध्यक्ष, भाजप वाघोली शहर)

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page