भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
विद्या प्रतिष्ठान संचलित शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल भोर, ता.भोर मधील विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व भोर तालुका विधी सेवा समिती, भोर आयोजित कायदेविषयक जनजागृती करून मार्गदर्शन केले.
समाजात एक सुजाण नागरिक घडवीत असताना त्यांना सामाजिक व कायदे विषय ज्ञान असणे गरजेचे असते. त्यामुळे भोर वकील संघटने चे सचिव विक्रम घोणे यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक जनजागृती करून कायद्या नुसार कोणते कलम लावली जातात या विषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी जसे निवडणूक अधिकार, समानतेचा अधिकार, जातिभेद धर्मभेद, दुर्बल घटकांमधील भेदभाव बाल गुन्हेगारी स्त्रियांचे स्वातंत्र्य व समान संधी तसेच कायद्याचे उल्लंघन याविषयी कायदे व त्याचे ज्ञान माहिती देवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. विद्यार्थ्यांची जबाबदारी अशा अनेक विषयाची त्यांनी माहिती दिली. या वेळी के .बी. आखाडे व सुशांत बुणगे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रुपाली नेवसे यांनी मानले. तसेच शिक्षक वृंद व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





