- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणतंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विनोद जवळकर तर उपाध्यक्षपदी जालिंदर शिवरकर बिनविरोध

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विनोद जवळकर तर उपाध्यक्षपदी जालिंदर शिवरकर बिनविरोध

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विनोद जवळकर यांची तर उपाध्यक्षपदी जालिंदर शिवरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच सोनाली तुषारशेठ जवळकर, उपसरपंच मनीषाताई भोंडवे, ज्येष्ठ नेते भगवान (अण्णा) जवळकर, अशोक (भाऊ) जवळकर, मोहना जवळकर, ग्रामपंचायत सदस्य सखाराम थोरात, दयानंद शिवरकर, पारस वाल्लेकर, युवा नेते महेश (दादा) जवळकर प्रतीकशेठ शिंदे, गणेश (दादा) जवळकर, महेश गायकवाड, प्रकाश (शेठ) जवळकर, सचिन जवळकर, बाळू (आप्पा) शिवरकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद जवळकर व उपाध्यक्ष जालिंदर शिवरकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. गावातील लहान मोठे तंटे स्थानिक पातळीवर मिटवून गावाला भविष्यात तंटा मुक्त गावाचा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच नागरिकांनी देखील एकदिलाने राहून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी असे आवाहन यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद जवळकर यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page