भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
शेतात काम करीत असताना टॅक्टर पलटी होऊन युवकाच टॅक्टर खाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाझरे (ता. भोर) येथे घडली आहे. गौरव महादेव काळे (वय २६ रा. नाझरे, ता. भोर) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विष्णू विनायक खोपडे (वय ५८ रा. नाझरे) यांनी भोर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाझरे (ता. भोर) येथील गौरव काळे हा जिओ कंपनीच्या टॉवर मेंटन्सचे काम भोर व वेल्हे परिसरात करत होता. आज तो दुपारी बारा वाजता शेतजमीन गट नंबर ५२८ मध्ये ट्रॅक्टर घेऊन शेतीचे काम करण्यासाठी गेला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर बांधावरून पलटी होऊन त्या खाली गौरव सापडला असल्याचे फिर्यादीस कळाले असता फिर्यादी घटनास्थळी पोहचले. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी त्याच्या अंगावरील ट्रॅक्टर उचलुन बाहेर काढला. जखमी अवस्थेत गौरव बेशुध्द अवस्थेत पडलेला असल्याने गौरवला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय भोर येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासले असता तो मयत असल्याचे सांगितले. पुढील तपास भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे व पोलिस करीत आहेत.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





