- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभीमा नदी तीरावर उत्तर भारतीय बांधवांकडून छट पूजा उत्साहात साजरी

भीमा नदी तीरावर उत्तर भारतीय बांधवांकडून छट पूजा उत्साहात साजरी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव भीमा, सणसवाडी, पेरणे, लोणीकंद, शिक्रापूर परिसरातील उत्तर भारतीय बांधवांकडून मोठ्या उत्साहात छटपूजन करण्यात आले. औद्योगिक वसाहतीमुळे नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा, सणसवाडी तसेच पेरणेफाटा परिसरात नोकरी व्यवसायानिमित्त मोठ्या संख्येने आलेले उत्तर भारतीय बांधव राहत असून जनकल्याण सोशल ट्रस्टच्या माध्यमातून ते वेगवेगळे तसेच सामाजिक उपक्रमही वर्षभर सातत्याने राबवतात.


जनकल्याण सोशल ट्रस्टच्या पुढाकाराने सलग पाचव्या वर्षी भीमा नदीतीरी छटपूजनाची व्यवस्था करण्यात आली. या वेळी उपस्थित बंधू भगिनीनी उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली. या वेळी प्रसादाचे वाटपही करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, कोरेगावचे सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, महेश ढेरंगे, संपत गव्हाणे, ग्राहक पंचायतीचे जिल्हा कोषाध्यक्ष भानुदास सरडे, विजय पाटीलबुवा गव्हाणे, विकास दरेकर, मोहन पांडे, राजेंद्र दरेकर आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हिंदी भोजपुरी गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.


दरम्यान छटपूजेपूर्वी व नंतरही उत्तर भारतीय बंधूनी एकत्र येत भीमा नदी परिसर स्वच्छ केला. या कार्यक्रमासाठी जनकल्याण ट्रस्टवे अध्यक्ष सुरेशकुमार सिंह, उपाध्यक्ष शैलेन्द्र कुमार सिंह, सचिव रविशंकर सिंह, खजिनदार चंद्रभूषण कुंवर, सुरेंद्र उपाध्याय, राकेश सिंह, संतोष सिंह, नंदलाल गुप्ता, शंकर चौधरी, अजय सिंह, राजेश सिंह, रोहित पटेल, रमण कुर, ललित ठाकूर, कौशलेंद्र सिंह चंदन सिंह, विकास सिंह, कौशल ओझा आदीसह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page