भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भोर तालुक्यातील विसगाव खो-यातील ग्रामीण भागात रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीला वेग आला आहे. गेले आठ दिवसा पर्यंत पाऊस मोठ्या प्रमाणात पडत होता. यंदा खरीपाची पीके चांगली येवून सुध्दा पावसामुळे धोक्यात आली. शेतक-यांनी पेरणी पुर्व मशागतीची कामे पूर्ण करुन ज्वारी पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

शेताची मशागत पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनी शेतात ज्वारी पेरणीसाठी लगबग चालू झाली. पावसाने उघडीप दिल्याने जमिनीला वापसा आल्याने पाभारीच्या चाढ्यावर मुठ धरली आहे. पावसाने उघडीप दिल्याने भात, भुईमूग, सोयाबीन, कडधान्य हि पिके शेतकऱ्यांनी काढून शेतीची मशागत करून रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीला वेग आला आहे.शेतकरी आपल्या बैलांना जीवापाड जपतात, शेतकऱ्याची हैस रब्बी हंगामातील पेरणीला बैलांना सजवून पेरणी करतात. शेतकरी आपल्या बैलावर अजून जिवापड प्रेम करीत असल्याचे दिसून येत आहे.





