खानापूरच्या शेतकऱ्यांचा अभिनव उपक्रम
भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
शेतकरी आता बदलत्या युगाप्रमाणे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करताना दिसत आहेत. अशीच एक घटना भोर तालुक्यातील खानापूर गरुडवस्ती घडली आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने माळरानावर स्टाॅबेरीची शेती फुलवली आहे.
भोर तालक्यातील खानापूर गावातील स्वप्निल मरगजे या शेतकऱ्याने रोहिदेश्र्वर गडाच्या डोंगर माळरानावर 3 आर एवढ्या कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत स्टाॅबेरीची यशस्वी शेती केली आहे. व्हर्टिकल फार्मिंग, टेबल टाॅप फार्मिंग, बेड फार्मिंग, ग्रो बॅग फार्मिंग असे आधुनिक प्रयोग करत त्यांनी ही शेती केली आहे. परिसरातले शेतकरी ही आधुनिक शेती पाहण्यासाठी आणि या शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी गर्दी करत आहेत. स्टाॅबेरीची शेतीसाठी अमोल अंबुले व प्रकाश गोळे यांचे मार्गदर्शन घेत ही शेती केली आहे.

मदर प्लांटपासून घरी तयार केलेली २८०० रोपे महिन्याची झाल्यावर त्यांची लागवड करण्यात आली आहे. लागवड करताना ग्रो बॅग मध्ये बॅग भरताना ५० टक्के माती, 30 टक्के कोकोपीट, २० टक्के कंपोस्ट खताचा वापर करण्यात आला. या शेतीला बोअरवेलचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे रोपांना पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आलं आहे.

लालबुंद स्ट्रॉबेरी रोप लागल्यानं आजपर्यंत ७० हजार रुपये खर्च करून दोन टन स्टाॅबेरीचा उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. १५० रुपये किलोने तीन लाखांचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. यासाठी घरातील सदस्य आई, वडील, पत्नी, मुले यांच्या सहकार्याने स्टाॅबेरीची शेती यशस्वी झाली असल्याचं शेतकऱ्यानी म्हटलं आहे.
स्ट्रोबरीच्या या आधुनिक शेतीमुळे चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. व माळरानावर शेती फुलवली असल्याने इतर शेतकऱ्यांना असे वेगवेगळे प्रयोग शेतीत करण्यास खूप मदत होणार आहे.





