शिरुर : प्रतिनिधी
दीपावलीच्या निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान शिरूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत लहान गटात तन्मय राऊत याचा तर मोठ्या गटात ओम वाळके, पार्थ कडेकर व सोहम अवचार यांना पारितोषिक देण्यात आले.
दिवाळी निमित्त आयोजित किल्ले स्पर्धा दोन गटात झाली. त्यातील गट निहाय निकाल पुढील प्रमाणे
लहान गट – प्रथम क्रमांक तन्मय राऊत, द्वितीय क्रमांक आदर्श काळोखे, तृतीय क्रमांक साई ससाने.
मोठा गट :- प्रथम क्रमांक ओम वाळके, पार्थ कडेकर, सोहम आवचार, द्वितीय क्रमांक आदित्य ठोंबरे, तृतीय क्रमांक ऋषिकेश गुजर.
बक्षीस विजेत्याना तसेच सर्व सहभागी स्पर्धांकाना जिजामात उद्यान शिरुर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती व मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, सेवानिवृत्त लष्करी आधिकारी वसंत कटके, समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे अध्यक्ष प्रा सतीश धुमाळ, तर्डोबावाडीचे उपसरपंच गणेश खोले, शोभना पाचंगे, प्रा. सुदाम वीर आदी यावेळी उपस्थित होते .
सतीश धुमाळ म्हणाले की गडकोट किल्ल्याचे जतन करणे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे गडकोट किल्ले यांचा इतिहास जाणून घ्या असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा आढावा ही त्यांनी यावेळी घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश शेळके यांनी केले. त्यात त्यांनी सांगितले की मुलांना गड किल्ले याची माहिती व्हावी किल्ल्यांविषयी कुतूहल निर्माण व्हावे या हेतूने शिरूर शहरामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने दिवाळीनिमित्त किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुलांच्या घरी जाऊन त्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचे परीक्षण करण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले. याप्रसंगी वसंत कटके, संजय बारवकर, प्रा. सुदाम वीर यांनी ही य मनोगत व्यक्त केले. स्वागत व आभार कुणाल काळे यांनी मानले .





