भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने नाशिक येथील कुसुमाग्रज सभागृहात घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात भोर येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज धुमाळ यांना २०२२ चा राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दुर्गम डोंगरी भागातील तरुण समाज ऋण फेडीत असताना देहभान विसरून समज्याशी आपली नाळ जोडतो आणि दिन दुभळ्यांची जमेल त्या पद्धतीने जमेल तशी सेवा करण्याचे भाग्य आपल्या हाती घेतो. अशा समज्यारुपी तळमळ असणाऱ्या व्यक्ती ना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत भरीव योगदान असलेल्या गुणिजनांचा दरवर्षी सन्मान केला जातो. पसुरे ( ता.भोर ) येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज धुमाळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सण २०२२ चा राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार देण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे शुभहस्ते व मोनिका यशोद,गणेश जोशी यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी अकादमीचे स्वागताध्यक्ष एल. एस. दाते, शशिकांत सेलूकर, चंद्रहास गावंड, अमोल सुपेकर, संयोजक मनिषा कदम, समाजसेविका मीनाक्षी गवळी उपस्थित होते.
“सदरील पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढली असून सामाजिक कार्य करण्यास आणखी बळ मिळाले” असे मत आपली लोकशाही शी बोलताना मनोज धुमाळ यांनी व्यक्त केले





