पुरूष, महिलांना सह बालकांनी केली मनोभावे पूजा.
वाघोली : प्रतिनिधी
वाघोली, ता. हवेली येथील भैरवनाथ तळ्याकाठी मावळत्या सूर्याला फळांचा नैवेद्य व अर्घ्य देत उत्तर भारतीय नागरिकांकडून रविवारी (दि.३०) सायंकाळी छटपूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भैरवनाथ तळ्यावर पुजेसाठी महिला, पुरुष,लहान मुलांपासून वृद्धांनी मोठी गर्दी केली होती.

छट पूजा साजरी करण्यासाठी वाघोलीसह चंदननगर, खराडी,लोहगाव आव्हाळवाडी, केसनंद, लोणीकंद, भावडी परिसरातील उत्तर भारतीय नागरिकांनी भैरवनाथ तळ्याकाठी उपस्थिती लावून घरामध्ये सौख्य नांदू दे, सुख समृद्धी चांगले आरोग्य मिळू दे अशी प्रार्थना मावळत्या सूर्यदेवाला केली. भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता. भाविकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत छट पूजा साजरी केली. भाविक महिलांनी पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य व फळाचा नैवेद्य सूर्यदेवाला अर्पण केला गेला. यावेळी लहान मोठ्या सह प्रत्येक उत्तर भारतीयांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, उपसरपंच महेंद्र भाडळे, माजी नियोजन समिती सदस्य संजय सातव पाटील, नियोजन समिती सदस्य रामकृष्ण सातव पाटील, सुनील (चाचा) जाधवराव, भाजपचे अनिल सातव पाटील, माजी उपसरपंच शांताराम कटके, केतन जाधव, शनि शिंगारे, गणेश गोगावले, मिनाकाकी सातव पाटील, कैलाश सातव, भारत सातव, मंगेश सातव तसेच छट पूजा समितीचे परेश ठाकूर, मुन्ना शर्मा, रणजित शर्मा, वीरेंद्र शर्मा, हरेश्वर सिंग स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचारी,पोलीस प्रशासन उपस्थित होते. छट पूजा समितीच्या माध्यमातून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याबाबत काळजी घेण्यात आली.





