वाघोली : प्रतिनिधी
‘बेटी बचाव बेटी पढाव’आणि झाडे लावा झाडे जगवा व पर्यावरणाचा ऱ्हास टाळा हा संदेश देत वाघोली (पुणे) ते गुजरात सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी हा प्रवास पर्यावरण व सायकल प्रेमी युवराज दळवी आणि त्यांचे सहकारी करत आहेत. आळंदी येथून या प्रवासाची सुरुवात (दि.२६) ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता करण्यात आली.

पहिल्या दिवशी १५० कि.मी.महत्त्वाचा टप्पा असून तो पूर्ण करत संगमनेर येथे पहिला मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी १६० कि.मी. प्रवास करून पेठ येथे मुक्काम तर तिसऱ्या दिवशी १४० कि.मी प्रवास करत ऊनई माता मंदिर येथे मुक्काम व चौथ्या दिवशी सकाळी सहा वाजता सुरुवात करत सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे पोहोचत एकूण ६१० कि.मी प्रवास करत आणि वरील संदेश देत व जण जागृती करत चार दिवसांमध्ये पूर्ण करणार आहेत. यामध्ये पुणे जिल्हा महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष युवराज दळवी, विकास भोरडे, समीर खवले, दीपक शिंदे, गणेश पवार या सायकल प्रेमीनी सहभाग घेतला आहे. मागील वर्षी सायकल प्रेमींनी पुणे ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास यशस्वी केला होता. अश्या अनोख्या प्रवासामुळे युवराज दळवी यांना वाघोली रत्न या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आले होते.





