- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणगवडी सोसायटीच्या वतीने १२ टक्के लाभांश वाटप

गवडी सोसायटीच्या वतीने १२ टक्के लाभांश वाटप

- Advertisement -spot_img

भोर : प्रतिनिधी स्वप्नीलकुमार पैलवान
गवडी विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या वतीने ऐन दिवाळीत १२ टक्के लाभांश वाटप केल्याने सभासदांची दिवाळी झाली गोड.
दुर्गम डोंगरी भागातील गवडी, शिंद, नांद या तीन गावची मिळून एक विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी आहे. या गवडी विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीची स्थापना ३० एप्रिल १९६२ साली झाली असून या सोसायटीत एकूण ८५० सभासद आहेत. या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजा भागविण्यासाठी मदत होते. या विकास सोसायटीने बँक पातळीवर कर्जाची ९६ टक्के वसुली केली तर संस्था पातळीवर ७३ टक्के वसुली करून सभासदांना १२ टक्के लाभाऊंश वाटप करण्यात आले.


सभासदांची दिवाळी गोड झाल्याने चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत होता. या संस्थेच्या माध्यमातून सन २०२१ – २२ मध्ये खरीप पिकासाठी एक कोटी ७४ लक्ष तर रब्बी साठी ६४ लक्ष ७९६४८ रुपये वाटप मध्यम मुदत साठी ७५५२ रुपये असे एकूण २,४१,५५,८३९ रुपये वाटप करण्यात आले. २०२२ – २३ मध्ये खरीप पिकासाठी एक कोटी ८२ लक्ष ७३०००/- रब्बी पीक साठी ८ लक्ष ३१०००/- असे एकूण १ कोटी ९१ लक्ष ३४ हजार वाटप केल्याची माहिती सचिव सागर दुधाने यांनी दिली.


लाभांश वाटप करते वेळी विकास सोसायटीचे चेअरमन रामदास भोंडवे, व्हा. चेअरमन हरिभाऊ जाधव, पोपट सोनवणे, चंद्रकांत सुतार, विठ्ठल इंगवले, अशोक धोंडे, गणेश साळुंखे, अरविंद सुर्वे, लक्ष्मण दुधाने, विठ्ठल गोळे, श्रीमती जिजाबाई खुटवड, पार्वती चोर व इतर सभासद उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page