- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणबेवारस पिल्लांना 'ती' मिळवून देते हक्काचे घर..!

बेवारस पिल्लांना ‘ती’ मिळवून देते हक्काचे घर..!

- Advertisement -spot_img

पुणे :प्रतिनिधी सुभाष पाचारणे
सध्याच्या धावपळीच्या युगात दैनंदिन जीवन जगताना माणूस हैराण होतो..आणि त्यात जर ती नोकरी करणारी स्री असेल तर गोष्ट अजूनच अवघड. नोकरी करून घर सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. आणि या सर्वात आपला एक वेगळा छंद जोपासणं म्हणजे एखाद्या अवलियाचंच काम.


सौ. कुमुद कैलास शेजवळ अशाच एक अवलिया.. आंबेगाव बु! येथील उत्कर्ष विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी.. घरी नोकरी निमित्त बारा तास बाहेर असणारा नवरा.. एक मुलगी..अविवाहित दीर. म्हातारे सासू सासरे.. त्यात सासरे अंथरुणाला खिळलेले. या सर्वांचं करून वर यांचा छंद काय तर रस्त्यावर बेवारस भटकणारी कुत्र्यांची पिल्ले आणून त्यांचं पालन पोषण करून नातेवाईकांत , मित्र मंडळीत चौकशी करून त्यांना हक्काचं घर मिळवून देणं.
रस्त्यानं जाताना येताना कुठंही असं बेवारस कुत्र्याचं पिल्लू दिसलं की त्या त्याला गाडीत टाकतात. घरी आणून त्याला गरम पाण्याने अंघोळ घालून औषध पाणी करतात. नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना फोन करून चौकशी करतात आणि ज्या कुणाला ते हवं असेल ते त्यांच्या घरी नेवून त्याची व्यवस्थित देखभाल करण्याची हमी घेवून त्यांना ते भेट देतात. आजपर्यंत त्यांनी सात पिल्लांची देखभाल करून त्यांना हक्काचं घर मिळवून दिले आहे.


त्यांच्या या छंदाची आवड लक्षात घेऊन त्यांचे पती श्री कैलास शेजवळ, इंजिनिअर मुलगी योशिता शेजवळ आणि मैत्रीण सौ. सुनंदा मिंडे त्यांना या कामात मदत करतात. सौ. शेजवळ यांच्या या अनोख्या छंदाबद्दल त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींना विशेष कौतुक आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page