गजानन गव्हाणे पाटील
पिंपरी सांडस, ता. हवेली ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच आतिष निवृत्ती ढगे यांची निवड करण्यात आली. गंगुबाई वायकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी विद्यमान सरपंच राजूआण्णा भोरडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्री. भोसले यांनी काम पाहिले.

यावेळी सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, संचालक, तरूण मित्र परिवार, ग्रामस्थ आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर ढगे यांचा गुलालाची उधळण करत सत्कार करण्यात आला. गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम गावात राबविण्यात येणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच आतिष ढगे यांनी सांगितले.





