- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमाजी उपसरपंच अमोल शिवले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक...

माजी उपसरपंच अमोल शिवले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसह मिठीचे वाटप

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व श्री क्षेत्र तुळापुर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमोल (आप्पा) शिवले पाटील यांनी ईश्वरपुरम (जाणीव संस्था) या ठिकाणी नागालॅंड मिझोरम येथील गरीब गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीबरोबरच दिवाळी फराळाचे वाटप करुन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.


भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व श्री क्षेत्र तुळापुर ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच अमोल (आप्पा) शिवले पाटील अमोल शिवले पाटील यांनी वाढदिवसानिमीत्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी जाऊन महाराजांची पूजा व अभिषेक केला. त्यानंतर वेदप्रकाश गोयल मतिमंद विद्यालयात दिवाळी फराळाचे वाटप करुन संस्थेला आर्थिक स्वरुपाची मदत केली. तसेच ईश्वरपुरम (जाणीव संस्था) या ठिकाणी नागालॅंड मिझोरम येथील गरीब गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसह दिवाळीच्या फराळाचे वाटप केले.


यावेळी फुलगावचे मा. सरपंच कांताराम वागस्कर, लोणीकंदचे मा. उपसरपंच रविंद्र कंद, डोंगरगावचे मा. सरपंच विक्रम गायकवाड, पीएमआरडीएचे सदस्य व मांजरीचे मा. सरपंच स्वप्निल उंद्रे, सणसवाडीचे मा. सरपंच शिवाजी दरेकर, पेरणेचे मा. उपसरपंच रविंद्र वाळके, पै. किरण साकोरे, तुळापुरचे मा. सरपंच गणेश पुजारी, फुलगावचे मा. उपसरपंच राहुल वागस्कर, तुळापुचे मा. उपसरपंच राहुल राऊत. मा.उपसरपंच संतोष शिवले, हवेली भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ओंकार कंद, ग्रा.पं. सदस्य संजय चव्हाण, पीडीसी बॅंकेचे कृषी अधिकारी योगेश शिवले, जयेश कंद, अमित दरेकर, नवनाथ हरगुडे, सुरज दरेकर, युवा नेते योगेश शिवले, तंटामुक्ती उपाध्यक्ष अनिल शिवले, संतोष शिवले, माऊली उंदरे, सोपान शिवले, राहुलदादा शिवले आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page