मित्र – मैत्रिणींना भेटून जुन्या आठवणीत झाले चिंब
भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
ही आवडते मज मनापासूनी शाळा.. लाविते लळा, ही जशी माऊली बाळा…. अशी भावना व्यक्त करत भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात महुडे गावातील घेवडेश्वर माध्यमिक विद्यालय महुडे या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळा जमला होता.
या वेळी जीवनाला आकार देणाऱ्या गुरुजनांना भेटण्याचा योग आल्याने तसेच अनेक वर्षानंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात जमल्याने जुन्या आठवणींना वीस वर्षांनी उजाळा मिळाला. या आठवणीत हे विद्यार्थी शाळेत जाण्याचा योग आल्याने मात्र भारावून गेले होते. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन पण आज चांगल्या हुद्यावर नोकरी व उत्तम व्यवसायिक काम करीत असणाऱ्या या मुलांनी आजच्या आधुनिक सोयी सुविधा पासून ग्रामीण भागातील मुले वंचित राहू नयेत ह्या दूरदृष्टीतून आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो या मनोवृत्ती तुन त्यांनी मुलांना प्रोजेक्टर वर्क साठी लॅपटॉप व शैक्षणिक साहित्य शाळेस भेट दिली.

या वेळी अमोल यादव, गणेश खुडे, नीता बांदल, मुक्त बांदल ,सीमा गुरव, विजय दामगुडे, योगेश कोंढाळकर, शीलम बांदल. शाळेचे मुख्याध्यापक पी. बी. टापरे, एस. एस. भिलारे, जगदाळे एस जी, देसाई एम बी, तळेकर एस बी, बांदल एम एस, जडले एस एल, शिंदे डी जे,रोमन एम के, पुजारी एस सी उपस्थित होते.
आपली शाळा पाया भक्कम करणारे एक संस्कार मंदिर आहे. या विषयावर शिक्षण घेत असलेल्या मुलांना पण मोलाचे मार्गदर्शन करत जुन्या आठवणी उजाळा दिला. कर्तव्य, जबाबदारी, उत्तरदायित्व गुरुदक्षिणा अशा भावना व्यक्त करत शाळेचे मुख्याध्यापक यांचे आभार मानले.





