मांजरी खुर्द : प्रतिनिधी माऊली उंद्रे
आनंदमय दिवाळीसाठी आनंदाचा शिधा !
कोरोना कालखंडात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर मोफत धान्य वाटप करण्यात आले. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या दिवाळीच्या निमित्ताने “आनंदाचा शिधा” निर्णयामुळे सामान्यांची दिवाळी गोड झाली.

दिवाळीसाठी राज्य सरकारच्या वतीने जाहीर केलेला आनंदाचा शिधा लोकांपर्यंत पोहचत आहे. दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून १०० रुपये देऊन आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा सरकारनं केली होती. ती रक्कम भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहीदासशेठ उंद्रे पाटील यांच्या नेतृत्वात भाजपा मांजरी खुर्द यांच्या वतीने मांजरी खुर्द येथे स्वस्त धान्य दुकानावर रोहिदासशेठ उंद्रे पाटील यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.
यावेळी वसंतभाऊ उंद्रे, पीएमआरडीये सदस्य स्वप्निल उंद्रे, माजी सरपंच विलास उंद्रे, शिवानाना उंद्रे, अशोक उंद्रे, विलास उंद्रे, राजेंद्र उंद्रे, चेअरमन सोमनाथ जेधे, सरपंच निखील उंद्रे, उपसरपंच प्रतिक भोसले, रामदास बांगर, सतिश आव्हाळे, संजय गरूड, सुनिल उंद्रे, ग्रा. सदस्य मनिषा ढेरे, हिरामण गवळी, दादा साहेब थोरात, रघुनाथ उंद्रे यांच्यासह आजी माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा.चेअरमन, जेष्ठ नेते, युवा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमात दोनशे पेक्षा जास्त रेशनकार्ड धारकांना आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले असून यामुळे त्यांची दिवाळी नक्कीच गोड झाली असल्याचे रोहिदास उंद्रे यांनी सांगितले. या वाटपादरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. सदर लाभार्थ्यांकडून या योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असून समाधान व्यक्त करीत आहे.





