गजानन गव्हाणे पाटील
न्हावी सांडस, ता. हवेली ग्रामपंचायतचीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये श्री नाथसाहेब ग्रामविकास पॅनेलच्या बायडाबाई सदाशिव निकम यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

रोहिणी पांडुरंग शितोळे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ग्रामपंचायत कार्यालयात विद्यमान सरपंच नामदेव बापु शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक अ. एस. कांबळे यांनी काम पाहिले.

निवडीनंतर निकम यांनी मिळालेल्या संधीचे सोने करुन ग्रामविकासाची कामे करणार असल्याचे सांगितले. उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी योगेश बाळासाहेब शितोळे अध्यक्ष संजय गांधी निराधार अनुदान योजना यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. यावेळी माजी चेअरमन तुकाराम बुवा शितोळे, माजी चेअरमन संजय आबा शितोळे, किसन वामनराव शितोळे सोसायटीचे संचालक, रणजीत पन्हाळे माजी सरपंच, प्रदीप कांबळे संदीप शितोळे, राजू पाटील शितोळे, सुभाष शितोळे, समीर शितोळे, भरत शितोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.






