- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणजयेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा वायफट खर्च टाळून विविध विधायक उपक्रम ...

जयेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा वायफट खर्च टाळून विविध विधायक उपक्रम …

- Advertisement -spot_img

तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी (प्रविणकुमार जगताप)
विठ्ठलवाडी ता.शिरूर येथील पुणे जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष व उद्योजक जयेश शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त होणारा वायफट खर्च टाळत सामाजिक सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शेतकरी महिलांना उन्हाळी टोपी वाटप, नाभिक व्यावसाय करणाऱ्या तरुणांना व्यवसायिक साहित्य भेट, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, गोरगरीब मजुरांना कौटुंबिक साहित्य वाटप, संजय गांधी निराधार योजेन अंतर्गत गरजू महिलांना लाभ मिळून देण्यासाठी मोहीम, माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांनी केलेल्या विकासकामांना फलक लावण्यात आले.


यामध्ये नुकताच तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथे अभिनेता सुभाष यादव प्रस्तुत खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटातून महिलांचा मोठा सहभाग घेतला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ या होत्या. सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकास आयोजकांकडून दिवाळी भेट देण्यात आली तर प्रथम पाच महिलांना पुणेरी पगडी, पैठणी व आकर्षक भेटवस्तू व हेलिकॉप्टने पुणे दर्शनसाठी पाठविणार असल्याचे पुणे जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे यांनी सांगितले.


हेलिकॉप्टर सफारीसाठी सुहासिनी भरणे (विठ्ठलवाडी),सिमा खोले (तळेगाव ढमढेरे ),सविता दरेकर (विठ्ठलवाडी),साधना दरेकर (दरेकरवाडी),सारिखा गवारे (विठ्ठलवाडी) यांची निवड करण्यात आली कार्यक्रम प्रसंगी शिरूर तालुका भाजपा ओबीसी सेलच्या महिलाध्यक्षा भाग्यश्री गायकवाड,दरेकरवाडी माजी सरपंच प्रमिला दरेकर,विट्ठलवाडी माजी सरपंच ललिता गाडे ,भाजपा नेते डॉ.राजेंद्र ढमढेरे ,संदीप ढमढेरे, शिरूर तालुका आर.पी.आय अध्यक्ष नवनाथ कांबळे,सुदर्शन तोडकर ,बाबूपाटील ढमढेरे तसेच तळेगाव ढमढेरे ,विठ्ठलवाडी,धानोरे,टाकळी भीमा परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन जयेशदादा शिंदे कोअर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page