गजानन गव्हाणे पाटील
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. शिरुर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या गावाना भेटी देवून पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.


यावेळी दानवे यांच्या समवेत शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) चे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) कटके, जुन्नर आंबेगाव जिल्हाप्रमुख श्री सुरेशभाऊ भोर, उपजिल्हाप्रमुख पोपटराव शेलार, जिल्हा संघटक अविनाश रहाणे, तालुकाप्रमुख गणेश तात्या जामदार, तालुकाप्रमुख सुधीर फराटे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र गायकवाड, शिरूर शिवसेना शहरप्रमुख सुनीलदादा जाधव, युवा नेते संदीपदादा शिंदे, तालुका संघटक समाधान डोके, उपतालुकाप्रमुख अनिलबापू पवार, तालुका संघटक विरेंद्र काका शेलार, युवासेना शिरूर शहर अधिकारी स्वप्नील अण्णा रेड्डी आदी होते .

दानवे यांनी कान्हूर मेसाई, कोंढापुरी व वाघाळे येथे पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली. रांजणगाव येथे महागणपतीचे दर्शन घेवून त्यांनी यावेळी आरती केली .






