- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणधानोरे शाळेच्या बालचमुंनी बनविली सुंदर भेटकार्डे आणि आकाश कंदील...

धानोरे शाळेच्या बालचमुंनी बनविली सुंदर भेटकार्डे आणि आकाश कंदील…

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या धानोरे शाळेतील १७० विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला आकाशकंदील बनविणे, भेटकार्डे तयार करण्याचा मनमुराद आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा, पर्यावरण पूरक विविध उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धन व्हावे, कोरोनाच्या महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी साजऱ्या होणाऱ्या दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत व्हावा म्हणून धानोरे शाळेत मुख्याध्यापक शंकर शिंदे, संभाजी भालेराव यांच्या पुढाकाराने आकाश कंदील तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.


सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून कार्डशीट पेपर, स्केच पेन, घोटीव कागद, कात्र्या इ. साहित्य मोफत पुरविण्यात आले. या कार्यशाळेत जयश्री वाळके ,वैशाली कुंभार ,मीनल ढवळे, दत्तात्रय वडघुले यांनी मार्गदर्शन केले.


तयार केलेले आकाशकंदील स्वतःच्या घरी मुले लावणार आहेत. स्वतः बनविलेली भेटकार्डे मित्र -मैत्रिणी आणि नातेवाईकांना देणार आहेत. या वर्षी प्रथमच मुलांना शाळेचे नवीन आकर्षक स्पोर्ट गणवेश देण्यात आले आहेत. यावेळी मुलांच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

दिवाळीत घरासमोर सुंदर रांगोळ्या काढून, पणत्या लावून,दीपोत्सव साजरा करत, हवेचे व ध्वनीचे प्रदूषण करणारे फटाके न फोडता एकमेकांना भेट कार्ड ,फराळ आणि शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी करतानाच फटाक्यांच्या वाचलेल्या रकमेतून अवांतर वाचनासाठी पुस्तके खरेदी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केल्याचे शिक्षक अनिल पलांडे, नवनाथ भुजबळ यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली भोसुरे, उपाध्यक्षा अश्विनी भोसुरे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page