- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणधोत्रे विद्यालयातआकाश कंदील कार्यशाळा संपन्न..

धोत्रे विद्यालयातआकाश कंदील कार्यशाळा संपन्न..

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील

दिवाळीच्या पूर्वसंध्येला फुलगाव, ता. हवेली येथील हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयात दोन दिवसाची आकाश कंदील तयार करणे व पणत्या रंगविणेची कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुभाष लोंढे सर यांनी विद्यार्थ्यांना व या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात श्री सतीश केकाण यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवण्यात येतील, विद्यार्थ्यातील कलागुण वाढीसाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे असे विचार मांडले.

विद्यालयाचे कलाशिक्षक श्रीरंग जाधव व अध्यापिका लंका भिलारे यांनी 40 मुला मुलीकडून 200 छोटे आकाश कंदील व 50 पणत्यांना रंगकाम करून घेतले. या कार्यशाळेसाठी संदीप इंगवले, शरद जाधवर, मनीषा वाळुंज, आगवणे मॅडम, सोनाली साळुंखे, नम्रता गवळी, पालवे मॅडम, आनंद जगताप, श्री. गायकवाड सर, गवळी मॅडम, नाना हेळकर, आकाश जंगले, सौ खोमणे मॅडम, संतोष शिंदे, ज्ञानेश्वर पाटोळे, प्रवीण राजगुरु आदींनी सहकार्य केले.

कार्यशाळा प्रदर्शन व समारोप प्रसंगी रमेश पाटील सर यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले व तशी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. या पर्यावरण पुरक दिवाळी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page