गजानन गव्हाणे पाटील
उज्जैनमधील ज्योतिर्लिंग महाकालेश्वर ‘महाकाल लोक’ च्या नवीन संकुलाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात आले. अगदी त्याचवेळी वाघोली, ता. हवेली येथील वाघेश्वर मंदिरामध्ये भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर श्रीमंत सरदार पिलाजीराव जाधवराव यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. आरतीचे आयोजन हवेली तालुका भाजपच्या वतीने कऱण्यात आले. वाघोली शहर भाजपच्या वतीने सुध्दा या आरती मध्ये सक्रिय सहभाग घेण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या लोकार्पण कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजपाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक भर पावसात बसून या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार झाले.

याप्रसंगी भाजपचे नेते पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप (दादा) कंद, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, भाजप हवेली तालुकाध्यक्ष संदीप (आप्पा)भोंडवे, पीएमआरडीए सदस्य स्वप्नील उंद्रे, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव गणेश (बापू) कुटे, भाजप वाघोली शहर अध्यक्ष केतन (भाऊ) जाधव, उद्योग आघाडी हवेली तालुका अध्यक्ष संतोष झुरुंगे, लोणीकंद चे माजी उपसरपंच रवींद्र कंद, भाजप हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील, हवेली सरचिटणीस विजय जाचक, पुणे जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष अमोल शिवले, भाजप वाघोली उपाध्यक्ष हरीश वाळूंज, युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस संदीप सातव, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष शरद आव्हाळे, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव, हवेली उपाध्यक्ष संतोष तांबे, सुप्रिया गोते, शिवलेताई, हवेली कार्याध्यक्ष शामराव गावडे, कामगार आघाडी अध्यक्ष जयेश शिंदे, सरचिटणीस नितीन गावडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती भाजप वाघोली अध्यक्ष केतन जाधव यांनी दिली.









