गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील फ्रेंड्स एज्युकेशन इंस्टीट्युट संचालित फ्रेंड्स नर्सरी/प्रायमरी/सेकंडरी स्कुल, कोरेगाव भीमाच्या माध्यमातून ग्रामस्वछता व शाळा स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, सचिव दिलीप भोसले, संचालक शंकर गव्हाणे, राजेंद्र गव्हाणे, रामदास सव्वाशे यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्याचे मुख्याध्यापकांना व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. दर महिन्याला शाळेतील सर्व कर्मचारी, मॅनेजमेंटने व शाळेतील मुला मुलीनी शाळा व गाव दर महिन्याला स्वच्छता करून स्वच्छता अभियान राबवत शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी मॅनेजमेंट व शिक्षकेतर कर्मचारी शाळा व गाव परिसरात स्वच्छता केली.
यावेळी मुले, मुली यांचे वेगवेगळे स्वयंसेवक मावळा संघ बनवून शाळा व गावाचा परिसर स्वच्छ करण्यात आला व सर्व परिसर स्वच्छ झाल्यानंतर ज्या मावळा संघाने चांगले काम केले त्या विजेता संघाचे कोरेगाव भीमाचे विद्यमान सरपंच अमोल गव्हाणे यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले. त्या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे सर म्हणाले कि जर प्रत्येक शाळेच्या कर्मचा-यांनि व मुलांनी शाळा व गाव दर महिन्याला स्वच्छ केले तर अपोआप देशातील सर्व गाव व शाळा स्वच्छ राहून मुले स्वच्छ शाळेत शिक्षण घेतील.
तर कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे म्हणाले कि भारतातील सर्व शाळांनी तुमचा आदर्श घ्यावा असे अनमोल कार्य दर महिन्याला स्वच्छता करून तुम्ही साध्य करणार आहात हा तुमचा संकल्प अभिमानास्पद व गौरवास्पद आहे, आपल्या कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा असा संदेश दिला. यावेळी स्वयंसेवक संघप्रमुख शिक्षक व शिक्षिका माधुरी गुंडाळ, सत्यम हंबीर, श्रीमंत प्रताळे, बाळासाहेब गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक मदन हराळ उपस्थित होते.





