गजानन गव्हाणे पाटील
” आत्ताची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी चाललेली आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणे सायबर फसवणूक होण्याची शक्यता आहे म्हणून या ॲप्समध्ये मुला मुलींनी लक्ष घालू नये व आपले आनंदी जीवण हे जास्त आनंदी कसे होईल यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे” असे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस नाईक ज्योती अहिरकर यांनी व्यक्त केले.
वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात निर्भया पथकांतर्गत आयोजित समुपदेशक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, मोबाईल मध्ये नवनवीन आलेले ॲप्स त्यामध्ये फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावरती युवा पिढी आहारी गेलेले आहे. प्रत्येकाने विद्यार्थी जीवनात अभ्यास, शिस्त याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु आजची तरुण पिढी वाईट वर्तनाकडे झुकलेली आहे वेळीच सुधारणे गरजेचे आहे असे मत ही अहिरकर यांनी व्यक्त केले . तसेच महिला पोलीस नाईक टाव्हरे मॅडम यांनी सुद्धा मुलींच्या अनेक प्रश्नांना योग्य उत्तरे दिली व मुलींच्या मनातील अनेक शंका समस्या यांचे समाधान केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक विलास कुरकुटे, व शिंदे सर, मंगल मोकाशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ भंडारे यांनी केले.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





