- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणस्वररंग सांस्कृतिक महोत्सव श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयात उत्साहात संपन्न

स्वररंग सांस्कृतिक महोत्सव श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयात उत्साहात संपन्न

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्वररंग सांस्कृतिक महोत्सव नुकताच श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग लोणीकंद, पुणे येथे पार पडला.


या कार्यक्रमाच्या उद्घाटन पर सोहळ्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. संतोष परचुरे उपस्थित होते. यावेळी श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारुती रामचंद्र भुमकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक मार्गदर्शन केले. या सांस्कृतिक महोत्सवामध्ये पुणे जिल्ह्यातील 54 पेक्षा अधिक महाविद्यालयातील 500 पेक्षा अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या महोत्सवात जिल्हास्तरीय सुगम संगीत व गायन, शास्त्रीय गायन, तालवाद्य, वादन, वैयक्तिक व समूहगीत गायन, लोक वाद्य वृंद, नृत्य वैयक्तिक व समूह, लोकनृत्य शास्त्रीय नृत्य, अभिनय- एकपात्री एकांकिका, मूकनाट्या, नकला, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, चित्रकला, रांगोळी, मेहंदी, यासारख्या एकूण ३५ सांस्कृतिक कला प्रकारांच्या स्पर्धा विद्यापीठाच्या नामांकित परीक्षकांच्या परीक्षणाखाली पार पडल्या.
या विद्यापीठ स्तरीय स्वर रंग महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालया पैकी स्वररंग महोत्सव २०२२ साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षकांच्या निर्णयानुसार प्रथम क्र. विजेते अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीरिंग चऱ्होली बुद्रुक पुणे, द्वितीय क्र. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंग लोणीकंद पुणे या महाविद्यालयांना जाहीर करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धक पुढील फेरीसाठी पात्र असल्याचे विद्यापीठाच्या प्रतिनिधी मार्फत जाहीर करण्यात आले.


सदर कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे डॉ. संतोष परचुरे संचालक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संस्थेचे अध्यक्ष मारुती भूमकर, प्राचार्य डॉ. अविनाश देसाई, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुषमा तायडे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. प्रिया पाटील, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. शिवशंकर पाटील व सर्व विभाग प्रमुखांनी सहभागी व विजेत्यांचे अभिनंदन केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page