- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगांव भिमा नं. 2 विविध कार्यकारी सेवा सोसायटी तर्फे 15% लाभांश

कोरेगांव भिमा नं. 2 विविध कार्यकारी सेवा सोसायटी तर्फे 15% लाभांश

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा विविध कार्यकारी विकास सोसायटी क्रमांक 2 ची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बबुशा आनंदराव ढेरंगे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. तर या वर्षी संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे सोसायटी चे चेअरमन बबुशा ढेरंगे व सचिव मधुकर कंद यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील बाजार चौकातील हनुमान मंदिर मध्ये जेष्ठ नेते आबासाहेब गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली. संस्थेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला. सन २०२१/२२ अखेरील आर्थिक हिशोबपत्रके, ताळेबंद, अंदाजपत्रक, अक्रियाशील सभासदांचे सभासदत्वा बाबत विचारविनिमय करून मान्यता देण्यात आली. संस्थेची कर्जवसुली चांगली असल्यामुळें संस्थेला १४.८६ लाख एकुण नफा झाल्याने निधींची गुंतवणूक करून सभासदांना १५ %टक्के लाभांश देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.


महाराष्ट्र शासनामार्फत वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,०००/ रुपये प्रोत्साहनपर लाभ, व्याज सवलत, संगणकीकरण, खत विक्री विभाग सुरु करणे इत्यादि विषयांवर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. संस्थेचे वयोवृध्द ज्येष्ठ माजी संचालक दगडू अंकूश गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचीत तज्ञ संचालक सर्जेराव दाजिबा गव्हाणे व नितिन ज्ञानेश्र्वर गव्हाणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण फडतरे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, घोडगंगाचे माजी संचालक विक्रमराव गव्हाणे पाटील, कैलास सोनवणे, वसंत गिलबिले, विक्रम दौंडकर यावेळी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष बबुशा ढेरंगे व उपाध्यक्ष सारिका गव्हाणे यांनी आभार मानले. यावेळी सर्व संचालक व कोरेगांव भिमा, डिंग्रजवाडी, वाडा पुनर्वसन येथील अनेक शेतकरी सभासद उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page